Kolhapur : गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीची सुरुवात | पुढारी

Kolhapur : गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीची सुरुवात

पुढारी ऑनलाइन डेस्क : कोल्हापूरमध्ये दोन वर्षानंतर ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे. तुकाराम माळी मंडळाच्या मानाच्या गणपतीची मनोभावे पूजा झाल्यानंतर कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिवसेनेचे विजय देवणे, कादंबरी बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश विसर्जन मिरवणूक थाटामाटात व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केलले आहे. प्रशासनाची व्यवस्था अगदी चोख आहे. विसर्जन मिरवणूक थाटामाटात मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे.

-सतेज पाटील

यावेळी गणपती बाप्पांना निरोप देणा-या घोषणांनी आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने, ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. कोणतीही अनुचित घटना आणि गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पारंपारिक विसर्जन मिरवणूक मार्गाव्यतिरिक्त नवीन मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच पर्यायी विसर्जन मिरवणूक मार्ग आखून दिला आहे. त्याचबरोबर परतीचा मार्ग देखिल दिला आहे.

कोविड मुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे दोन वर्षानंतर ही यंदाची गणेश उत्सव मिरवणूक निघत असल्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भक्तांचा मिरवणुकीचा उत्साह दुप्पटीनेही जास्त आहे.

मिरवणुकीचा मार्ग वाचा
कोल्हापूर : प्राधान्यक्रमावर मिरवणुकीत एन्ट्री

 

Back to top button