

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुख्य विसर्जन मार्गावर मंडळांची वाढलेली संख्या, मार्गावरील धोकादायक इमारती, मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी पाहता मंडळांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. मिरवणुकीत प्राधान्यक्रमाने येणार्या मंडळांना तत्काळ एन्ट्री दिली जाणार आहे. तसेच मिरवणूक रेंगाळणार्या मंडळांवरही पोलिसांचा वॉच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. मिरवणूक संपेपर्यंत तिन्ही मार्गांवर अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
मिरवणूक पाहण्यासाठी येणार्या नागरिकांसाठीचे मार्ग असे
मिरवणुकीचा मुख्य मार्ग बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी ते गंगावेश असा आहे. मिरवणुकीच्या विरुद्ध दिशेने लोकांनी येऊ नये. ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी रोड, भेंडे गल्ली इथून प्रवेश करणार्यांनी उलट दिशेने जाऊ नये. पिशवीकर हॉस्पिटल, कसबा गेट चौकी, पुष्कराज तरुण मंडळ, वणकुद्रे भांडी दुकान मार्गाने प्रवेश बंद असणार आहे. नागरिकांनी गंगावेश, पिशवीकर हॉस्पिटल, बाबूजमाल दर्गा, जोतिबा रोड, ताराबाई रोड मार्गाचा अवलंब करावा.
वाहतुकीसाठी बंद व खुले करण्यात येणारे मार्ग
1. रत्नागिरीमार्गे कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक शिवाजी पूल, सीपीआर चौक येथे येईल. सीपीआर चौकातून कोणत्याही वाहनाला छत्रपती शिवाजी चौकाकडे जाता येणार नाही. तसेच शहरातून पन्हाळा दिशेकडे जाणारी वाहतूक सीपीआर चौक, तोरस्कर चौक ते शिवाजी पूल मार्गे मार्गस्थ होतील.
2. कोल्हापूर शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ताराराणी पुतळा, रेल्वे उड्डाणपूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर कॉलेज, रिंग रोड मार्गे हॉकी स्टेडियम, रामानंदनगर, कळंबा जेल, साई मंदिर रिंग रोड, नवीन वाशी नाका, फुलेवाडी रिंग रोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
3. फुलेवाडीमार्गे शहरात येणार्या अवजड वाहनांना फुलेवाडी नाका या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने फुलेवाडी रिंग रोड, नवीन वाशी नाका, कळंबा जेल, रामानंदनगर, जरगर नगर, आरके नगर, मोरेवाडी नाका, सुभाषनगर, एस. एस. सी. बोर्ड, एनसीसी भवन, सायबर चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
4. शिये फाटा येथून शहरात येणारी सर्व प्रकारची वाहने तावडे हॉटेल, शिरोली टोल नाका येथून पुढे मार्गस्थ होतील. तसेच शहरातून कसबा बावडामार्गे राष्ट्रीय महामार्गावर जाणारी वाहने ताराराणी पुतळा, शिरोली टोल नाका, तावडे हॉटेलमार्गे शहराबाहेर जातील.
विसर्जनानंतर परतीचा मार्ग असा…
(मिरवण शिवाजी पेठ, मंगळवार पेठ येथील मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, पुढे तपोवन मैदान येथे थांबून राहतील तसेच इंदिरा सागर संभाजीनगर येथील वाहतूक सुरळीत असेल तर आवश्यकतेनुसार तपोवन येथे पार्क केलेली वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतील.
राजारामपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेलपासून वळण घेऊन रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर येथून शेंडा पार्क, सुभाषनगर, उद्यमनगर किंवा सायबर चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
शाहूपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्कपुढे सोयीनुसार मार्गस्थ.
लक्ष्मीपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्क, उद्यमनगर, पार्वती सिग्नल, गवत मंडईकडे जातील.
फुलेवाडीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, कणेरकरनगरमार्गे, गंगाई लॉनकडून पुढे मार्गस्थ होतील मिरवणूकीतील सहभागी वाहनांसाठी)
आपत्कालीन वाहनासाठी मार्ग
जोतिबा रोड, भवानी मंडप, महाद्वार रोड हा रस्?ता मिरवणूक मार्गावरून आपत्कालीन सेवेकरिता राखीव ठेवण्यात आलेला आहे. या मार्गावर वाहने पार्क होणार नाहीत तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना जाणे-येणेस मनाई आहे.
आपत्कालीनप्रसंगी सहा अॅम्ब्युलन्स व मार्ग
घाटी दरवाजा : जोतिबा रोड, भवानी मंडप, शिवाजी चौकमार्गे सीपीआर
पापाची तिकटी : पानलाईन, माळकर तिकटी, सीपीआर
गंगावेश : शुक्रवार गेट, आखरी रास्ता, शिवाजी पूल चौक, जुना बुधवारमार्गे सीपीआर
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल: सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा सिग्नल, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, टायटन शोरुममार्गे सीपीआर हॉस्पिटल
इराणी खण : क्रशर चौक, देवकर पाणंद, कृष्णा हॉस्पिटल
बिंदू चौक : मिलन हॉटेल चौक, स्वयंभू गणेश मंदिर, सीपीआर हॉस्पिटल
विसर्जनानंतर परतीचा मार्ग असा…
(मिरवणुकीतील सहभागी वाहनांसाठी)
शिवाजी पेठ, मंगळवार पेठ येथील मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, पुढे तपोवन मैदान येथे थांबून राहतील तसेच इंदिरा सागर संभाजीनगर येथील वाहतूक सुरळीत असेल तर आवश्यकतेनुसार तपोवन येथे पार्क केलेली वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतील.
राजारामपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेलपासून वळण घेऊन रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर येथून शेंडा पार्क, सुभाषनगर, उद्यमनगर किंवा सायबर चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
शाहूपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्कपुढे सोयीनुसार मार्गस्थ.
लक्ष्मीपुरीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल, रामानंदनगर, जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्क, उद्यमनगर, पार्वती सिग्नल, गवत मंडईकडे जातील.
फुलेवाडीकडे जाणारी मंडळे : रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, कणेरकरनगरमार्गे, गंगाई लॉनकडून पुढे मार्गस्थ होतील.
पार्किंग
विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता येणार्या मोटार वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली वाहने खालील ठिकाणी पार्किंग करावीत. दसरा चौक, सिद्धार्थनगर कमान, तोरस्कर चौक शाळा, दुधाळी, शिवाजी स्टेडियम, ताराराणी हायस्कूल मंगळवार दुचाकी पेठ, दसरा चौक, 100 फुटी रोड, शाहू दयानंद हायस्कूल, पेटाळा मैदान, गांधी मैदान, निर्माण चौक, संभाजीनगर बसस्थानक
गणेश विसर्जन मुख्य मार्गास जोडणार्या उपमार्गावर मुख्य मिरवणूक मार्गापासून 100 मीटर परिसरापर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाहना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील मोटार वाहनांना वगळून)