शेवगाव : तलाठ्यासह चार जणांंना जुगार खेळताना पकडले | पुढारी

शेवगाव : तलाठ्यासह चार जणांंना जुगार खेळताना पकडले

शेवगाव; पुढारी वृत्तसेवा: शहरातील सूर्या लॉजवर तिरट नावाचा जुगार खेळताना प्रतिष्ठित नागरिक व एका तलाठ्यासह चार जणांना रंगेहाथ पकडले आहे. नेवासा-शेवगाव रोडलगत असलेल्या सूर्या लॉज येथील एका रुममध्ये काही जण तिरट खेळत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, पोलिस नाईक अशोक लिपणे, सुखदेव धोत्रे व वासुदेव डमाळे यांच्या पथकाने दोन पंचांसमवेत छापा टाकला. यावेळी गणेश भीमराज निकम रा. मिरी रोड, शेवगाव), सोपान जनार्धन थोरात (रा. नेवासा रोड, शेवगाव), अंकुश रमेश पाठक (रा. मिरी रोड, शेवगाव), गणेश गोरख वावरे (रा. शेेेवगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस नाईक वासुदेव डमाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button