UP : Barabanki Accident : डबल डेकर बसला ट्रकची धडक, चौघांचा मृत्यू, 14 जखमी | पुढारी

UP : Barabanki Accident : डबल डेकर बसला ट्रकची धडक, चौघांचा मृत्यू, 14 जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : UP : Barabanki Accident बाराबंकी येथे बहराइच महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गावर उभी असलेली डबल डेकर बसला मागून भरधाव येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर 14 यात्री गंभीर जखमी झाले. तर चौघांची अवस्था नाजूक असल्याने केजीएमयू ट्रॉमा सेंटरसाठी दाखल करण्याबाबत सूचवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, UP : Barabanki Accident बाराबंकीत बहराइच महामार्गावर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास हा मोठा अपघात घडला. रामनगर पोलिस परिसरातील महंगूपूर गावाजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे जवळपास 3.30 वाजता एक डबल डेकर बस रुपईडीहापासून गोव्याला जात होती. बसमध्ये 60 प्रवासी होती. बस जेव्हा महंगूपूर गावाजवळ पोहोचली तेव्हा बसचा टायर पंक्चर झाला. बस चालकाने बस महामार्गाच्या कडेला बस लावून स्टेपनी बदलत होते.

दरम्यान, पाठीमागून भरधाव येणा-या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसमधील 18 प्रवासी गंभीर जखमी झाले. मार्गावर अपघाताचा आवाज ऐकल्याने गावातील लोकांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमी झालेल्या 18 प्रवाशांना बाहेर काढून ताबडतोब जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले. तर अन्य चार गंभीर रुग्णांना ट्रामा सेंटरमध्ये नेण्यासाठी सूचवले. अन्य जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहे.UP : Barabanki Accident

माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी UP : Barabanki Accident धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. एएसपी नॉर्थ पूणेंदु सिंह यांनी सांगितले की प्रवासी हे मजूर वर्गातील होते. मृतदेहांना पंचनाम्यानंतर पोस्टमार्टमसाठी पाठविले जाईल. तर अन्य प्रवाशांना दुस-या बसने परत पाठवले जात आहे.

Back to top button