१ सप्टेंबरपासून होणार ‘हे’ बदल! जाणून घ्या अधिक | पुढारी

१ सप्टेंबरपासून होणार 'हे' बदल! जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पगारदार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात एक सप्टेंबरपासून काही महत्त्वाचे बदल होऊ घातले असून त्याकडे लक्ष दिले तर आपली बचत होऊ शकते.

घरगुती गॅसच्या दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला घेण्यात येतो. काही बँकांचे नियम बदलणार आहेत. पीएम किसान योजनेतील शेतकर्‍यांसाठी तर एक सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. योजनेसंबंधीतील कामे करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. नाही तर तुमची रक्कम अडकू शकते. एवढेच नाही तर सप्टेंबर महिन्यात सणांमुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात तुम्ही बँकेसंबंधीचे कामकाज करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्याशी संबंधित काही क्षेत्रात बदल होत असेल तर तो लक्षात घ्या आणि ते काम त्वरित उरकून घ्या.

पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी केवायसी अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार 31 ऑगस्टपूर्वी ग्राहकांनी त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येईल. केवायसी अद्ययावत न करणार्‍या ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर खात्यातील व्यवहार करता येणार नाही. घरगुती गॅसच्या किमतीदर महिन्याच्या एक तारखेला पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅसच्या किमतीत बदल करतात. सातत्याने दरवाढ सुरू असल्याने घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो. तुमचा गॅस संपण्याच्या तयारीत असेल तर आजच जुन्या दराने गॅस नोंदवून टाका.

पीएम किसान योजना प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना केवायसीकरिता शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 निश्चित केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत या अटीची पूर्तता केली नाही तर शेतकर्‍यांचा पुढील हप्ता रखडू शकतो. विमा एजंटचे कमिशन घटलेजनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एजंटच्या कमिशनमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 30 ते 35 टक्क्यांऐवजी एजंटला 20 टक्के कमिशन मिळणार आहे. परिणामी ग्राहकांना आता विमा स्वस्तात मिळेल आणि या व्यवसायाची व्याप्तीही वाढेल.

Back to top button