Asia Cup 2022 : विराट कोहलीनं धोनीसाठी लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला… | पुढारी

Asia Cup 2022 : विराट कोहलीनं धोनीसाठी लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन : भारतीय किक्रेट टीम सध्या आशिया चषक 2022 साठी (Asia Cup 2022) यूएईमध्ये आहे. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवरून महेंद्रसिंह धोनीची आठवण काढत, एक भावनिक पोस्ट केली आहे. विराटने धोनीसोबतचा T20 विश्वचषक 2016 चे छायाचित्रही यावेळी पोस्ट केले आहे.

Virat Kohli's 'bromance' with MS Dhoni breaks the internet: Twitter cannot  stop replaying viral hug after RCB-CSK match

विराह कोहलीने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘या माणसाचे विश्वासू उपकर्णधार असणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायी आणि रोमांचक क्षण होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. ७+१८ असे म्हणत धोनीसोबत असलेल्या नात्याची एक वेगळी ओळख करून दिली आहे. विराटच्या या ट्विटने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Virat Kohli will always LOVE MS Dhoni. Find out why | IWMBuzz

विराट कोहलीने 2008 मध्ये पहिल्यांदा धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. 2012 च्या आशिया कपमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने प्रथमच उपकर्णधार पदाची जबाबदारी पहिल्यांदा स्वीकारली होती. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर 2015 मध्ये कसोटी आणि 2017 पासून ODI-T20 चे कर्णधारपद विराट कोहलीला मिळाले. विराटच्या या पोस्टला लाखांमध्ये लाईक्स मिळाले आहेत. (Asia Cup 2022)

Kohli could've been captain but who were they listening to? MS Dhoni' |  Cricket - Hindustan Times

हेही वाचा:

Back to top button