हार्दिक- अक्षयाचा हॉरर कॉमेडी ‘चतुर चोर’ लवकरच भेटीस; लंडनमध्ये शूटिंग | पुढारी

हार्दिक- अक्षयाचा हॉरर कॉमेडी 'चतुर चोर' लवकरच भेटीस; लंडनमध्ये शूटिंग

पुढारी ऑनलाईन : हॉरर कॉमेडीला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.लवकरच एक नवा कोरा हॉरर कॉमेडी ‘चतुर चोर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण लंडन येथे झाले. तगड्या स्टारकास्टचा हा सिनेमा असून या सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री प्रीतम कागणे, अक्षया देवधर हे कलाकार झळकणार आहेत.

हार्दिक, प्रीतम आणि अक्षयाने या सिनेमात काय हॉरर कॉमेडी केलीय हे पाहणं विशेष रंजक ठरणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलवली आहे. तर सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे. अमोल गोळे यांनी या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. तर चित्रपटाची कथा  सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांची आहे.

आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल?, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडी ‘चतुर चोर’ मधला चतुर चोर नेमका कोण असेल? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button