दीपिका पादुकोनचे बिकीनीमधील बोल्ड फोटो लीक झाल्याने खळबळ ! | पुढारी

दीपिका पादुकोनचे बिकीनीमधील बोल्ड फोटो लीक झाल्याने खळबळ !

पुढारी ऑनलाइन डेस्क : बॅालीवूड अभिनेञी दिपिका पदुकोणचा काही दिवसांपूर्वीच ‘गहराईया” हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमानंतर ती पठाण या आगामी सिनेमामध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून याच सिनेमाचा मुख्य अभिनेता शाहरूख खानच्या काही फोटोंची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता चर्चेतल्या फोटोंसाठी दिपिका सुद्धा यात मागे नाही. ती तिच्या सोशल मिडियावरील फोटोजमुळे आता खूप चर्चेत आली आहे. हे सर्व फोटो तिच्या पठाण या आगामी सिनेमाच्या सेटवरील आहेत.

दिपीकाचे बिकीनीमधील फोटो लीक

शाहरूख खान आणि दिपीका पादुकोण यांचे स्पेनमध्ये अॅक्शन आणि ड्रामांनी भरलेल्या ‘पठाण’ या सिनेमाचे शुटिंग चालू आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने प्रेक्षकांसाठी एक खास अॅक्शन आणि ड्रामांनी भरलेला सिनेमा देण्याचे नियोजन केले आहे. शाहरूख खानचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच दिपिकाचे देखील तिच्या मादक अदाकारीमध्ये काही फोटो व्हायरल झाले. या तिच्या या ग्लॅमर आणि मादक अदाकारींची चर्चा इंटरनेटवर चांगलीच रंगली.

दिपिका पादुकोणचे फोटोंची तिच्या चाहत्यांवर भुरळ

‘पठाण’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा नव्या सिनेमात दिसणारी ही अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे सध्या सोशल मिडियावर टॅापला आहे. या फोटोंमध्ये दिपिका ही नियॅान ग्रीन स्विमसूट मध्ये दिसून येते. तीचा चाहता वर्ग हा इंटरनेटवर तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. या फोटोंमध्ये दिपिका पादुकोण ही तिचा आकर्षक लूक आणि मादक अदा या तिच्या बोल्ड फिगरवरून दाखवताना दिसते.

हेही वाचा

Back to top button