कोल्हापूर : राधानगरी धरणाचा चौथा दरवाजा बंद; तीन दरवाजे अद्यापही खुले | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरणाचा चौथा दरवाजा बंद; तीन दरवाजे अद्यापही खुले

राधानगरी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. त्यामुळे आज (दि.१२) दुपारी ४ वाजता धरणाचा चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला. धरणाचे अद्याप ३ दरवाजे खुले आहेत. दरम्यान, सकाळी १० वाजता धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ बंद झाला होता. आता धरणाचे ५, ६,७ क्रमांकाचे ३ दरवाजे अजूनही खुले आहेत.

राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे दिवसभरात दोन दरवाजे बंद झाले. तीन दरवाजे अद्याप खुले आहेत. या तीन दरवाजातून ४२९४ व वीजगृहातून १६०० असा एकूण ५८९४ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सकाळी ९.५६ वाजता ३ क्रमांकाचा व दुपारी ४ वाजता ४ क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आहे. दरवाजे बंद झाल्याने काही प्रमाणात नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Back to top button