औरंगाबाद: नाथसागर धरणाचे दहा दरवाजे पुन्हा उघडले | पुढारी

औरंगाबाद: नाथसागर धरणाचे दहा दरवाजे पुन्हा उघडले

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक सोमवार (दि.८) वाढल्याने धरणाचे दहा दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. त्यामुळे सायंकाळी ६ हजार ८२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तीन दिवसापासून नाथसागर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी आज सायंकाळी सहा वाजता दहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदीत ६ हजार ८२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सध्या धरणातील पाणीसाठा २७६५ ३३८ दलघमी असून पाण्याची टक्केवारी ९३.३८ आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button