CWG Badminton : सुवर्ण ‘लक्ष्‍य’ ! बॅटमिंटनमध्‍ये डबल धमाका, राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत लक्ष्‍य सेनची सुवर्ण पदकावर मोहर | पुढारी

CWG Badminton : सुवर्ण 'लक्ष्‍य' ! बॅटमिंटनमध्‍ये डबल धमाका, राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत लक्ष्‍य सेनची सुवर्ण पदकावर मोहर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत बॅटमिंडन एकेरी भारताने डबल धमाका केला. पी. व्‍ही. सिंधूने दिमाखात सुवर्ण पदक आपल्‍या नावावर केले. यानंतर मैदानात उतरलेल्‍या भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्‍य सेननेही उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. अंतिम सामन्‍यात त्‍याने मलेशियाच्‍या जी याँग याला १९- २१, २१-९, २१-१६ असे पराभूत केले.

CWG Badminton:पहिला सेट गमावला, दुसर्‍या सेटमध्‍ये लक्ष्‍यचे दमदार कमबॅक

पहिला सेट अटीतटीचा झाला. लक्ष्‍य सेनने उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र अखेरच्‍या क्षणी काही अंदाज चुकल्‍यामुळे त्‍याला सेट गमावावा लागला. जी याँग याने हा सेट १९- २१ असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्‍ये लक्ष्‍य सेनने पुन्‍हा कमबॅक केले. सहा -सहा गुणांची बरोबरी साधली. प्रत्‍येक गुणांसाठी दोन्‍ही खेळाडूंना संघर्ष करावा लागला. दुसर्‍या सेटमध्‍ये लक्ष्‍य सेनने सलग दोन गुणांची कमाई करत ९-११ अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्‍याने गुणांची आघाडी कायम ठेवत दुसर्‍या सेटमध्‍ये दमदार कमबॅक केले. २१-९ने दुसरा सेट आपल्‍या नावावर करत सामना अजून संपलेला नाही हे जी याँगला सांगितले.

CWG Badminton : तिसर्‍या सेटमध्‍ये उत्‍कृष्‍ट बॅडमिंटनचे प्रदर्शन

तिसर्‍या सेटमध्‍ये दोन्‍ही खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट बॅडमिंटन खेळाचे प्रदर्शन केले. मात्र लक्ष्‍य सेन याने सलग तीन गुण घेत आघाडी घेतली. मात्र यानंतर दोन्‍ही खेळाडूंनी एका-एका गुणांसाठी संघर्ष केला. तरीही लक्ष्‍य सेन याने आपली आघाडी कायम ठेवण्‍यात यश मिळवले. लक्ष्‍यने  तिसरा सेट २१-१६ असा जिंकला.

हेही वाचा : 

Back to top button