Sanjay Pandey Arrested: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक | पुढारी

Sanjay Pandey Arrested: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज कथित फोन टॅपिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर एनएसईचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. (Sanjay Pandey Arrested)

एनएसईचे माजी प्रमुख रामकृष्ण यांच्या चौकशीनंतर पांडे यांना अटक

संजय पांडे यांच्या विरोधात यापूर्वी सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते, तर ईडीने सुद्धा २ गुन्हे दाखल केले होते. पांडे हे पोलीस खात्यातून निवृत्त होताच केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आले. एनएसईचे माजी प्रमुख रामकृष्ण हे सीबीआयच्या अटकेत असून कथित घोटाळा प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या चौकशीनंतर पांडे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

निवृत्त झाल्यापासूनच संजय पांडे केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असलेले संजय पांडे हे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या पाठीमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला. जून महिन्याच्या 30 तारखेला ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना तिस-या दिवशी ईडीची नोटीस आली होती. त्यांच्या कॉल रेकॅार्ड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांची शनिवारी सीबीआयच्या अधिका-यांनी चौकशी केली असल्याची माहिती समजली आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा

Back to top button