cervical cancer vaccine : गर्भाशय कॅन्सरवरील लस आता होणार भारतात तयार ; डॉ. अदर पूनावालांची माहिती | पुढारी

cervical cancer vaccine : गर्भाशय कॅन्सरवरील लस आता होणार भारतात तयार ; डॉ. अदर पूनावालांची माहिती

पुढारी ऑनलाईन :  गर्भाशयासाठी आजारापासून महिलांना वाचविण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटकडून एक क्रांतीकारी पाऊल टाकण्यात येत आहे. गर्भाशय कॅन्सरवरील लस आता भारतात बनवली जाणार आहे. यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला HPV ही लस तयार करण्याची मान्यता दिली असल्याची माहिती सीरमचे सीईओ डॉ. अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच भारतातील पहिल्या क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (qHPV) चे उत्पादन लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ डॉ. अदर पुनावाला यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रथमच भारतीय HPV लस उपलब्ध होणार आहे. जी सर्वसामान्यांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होणार आहे. आम्ही ही लस यावर्षाच्या शेवटपर्यंत भारतात लॉन्च करण्यास उत्सुक आहोत. या लसला परवानगी दिल्याबद्दल त्यांनी DCGI चे आभार देखील मानले आहेत.

महिलांमध्ये गर्भाशय कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी अनेक महिलांना योग्य उपचार उपलब्ध नसल्याने आणि उपचार घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक महिलांचा यामध्ये मृत्यू होतो. भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर हा दुसरा सर्वात घातक आजार आहे. परंतु, आता गर्भाशयाच्या कर्करोगाची लस भारतातच बनवली जाणार असल्याने, भारतातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

हेही वाचा:

 

 

 

Back to top button