वसई वाघरालपाडा येथे दरड कोसळली, चारजण ढिगाऱ्याखाली अडकले, दोघांना बाहेर काढण्यात यश (व्हिडिओ) | पुढारी

वसई वाघरालपाडा येथे दरड कोसळली, चारजण ढिगाऱ्याखाली अडकले, दोघांना बाहेर काढण्यात यश (व्हिडिओ)

वसई : पुढारी वृत्तसेवा : वसई पूर्व राजावली भगत असलेल्या वाघराल पाडा येथे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली चार जण सापडले आहेत. त्यातील दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दोघांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शीघ्र कृतीदल करत आहे.

या परिसरात काही चाळ माफियांनी आपल्या धाक दडपशाहीने अनधिकृत चाळी बांधल्या आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्या ठिकाणी कोणताही पोकलेन किंवा अग्निशमन दल पोहोचू शकत नसल्याने तिथे पोहोचणे कठीण झाले. दोन चाळींमध्ये अत्यंत कमी अंतर असल्याने फक्त मानवी बळावर रेस्क्यू करण्यात येत आहे.

येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनधिकृत चाळी राजरोस उभारल्या जात हेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. डोंगर पोखरून चाळ माफिया बांधकाम करत आहेत. जर वेळीच अशा चाळींना आळा घातला नाही तर पुढेही अशा दुर्दैवी घटना घडत राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

आताची धुवॉंधार पावसाची स्थिती पाहता दरड पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे. बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाला येथे पोहोचण्यासाठी चाळींच्या आखूड रस्त्यांमुळे अनेक अडथळे येत आहेत.

भोईदा पाडा, वाघराल, गोशाळेच्या पुढे एक खदानीजवळ असलेल्या झोपडीवर दरड कोसळली असून चार व्यक्ती अडकले असल्याची वर्दी मिळताच आचोळे रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली. सदर ठिकाणी NDRF TEAM पाचारण करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.

– मुख्य अग्निशमन केंद्र, आचोळे

Back to top button