Kerala Bomb Attack : केरळच्या कन्नूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला | पुढारी

Kerala Bomb Attack : केरळच्या कन्नूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

तिरुअनंतपुरम : पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात (Kerala Bomb Attack) आला. पयन्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. ही घटना आज पहाटे घडली आहे. यामध्ये कुठलीही हानी पोहोचलीय का? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (Kerala Bomb Attack)

बॉम्ब हल्ल्यानंतर आजूबाजूला गोंधळ उडाला. हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला? सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

आश्‍चर्याची बाब म्हणजे पोलिस स्टेशन जवळच असताना हा हल्ला झाला. भाजप नेते टॉम वडाक्कन यांनी एका इंग्रजी वाहिनीला सांगितले की, असे हल्ले रोखण्यात अपयशी ठरण्यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे.

Back to top button