वारकऱ्यांच्या वाहनांमधून टोल वसुली; पाटस टोलच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल | पुढारी

वारकऱ्यांच्या वाहनांमधून टोल वसुली; पाटस टोलच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

पाटस : पुढारी वृत्तसेवा: पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ८ जुलै ला आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली केल्याप्रकरणी पाटस टोल प्लाझाच्या चार अधिकाऱ्यांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.

पाटस टोल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर, टोल वसुली अधिकारी बालाजी वाघमोडे, टोल कंपनीचे अधिकारी सुनील थोरात व विकास दिवेकर यांनी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचे आदेश दिले असल्याचे परिपत्रक गुरुवारी (दि. ७) काढलेले असताना देखील पाटस टोल प्लाझा कंपनीने गाडी (एमएच ०४ केएफ ५७९७) ही आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असता टोलवर थांबवून या गाडी कडून टोलची मागणी केली. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरील टोल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील टोल नाक्यावरील चार कर्मचाऱ्यांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

Back to top button