विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी | पुढारी

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काल, शुक्रवारी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती ॲड. नार्वेकर यांनी दिली. विधानसभा अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच दिल्ली भेटीवर आहेत.

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची १७, अकबर रोड या शासकीय निवासस्थानी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ३२, पृथ्वीराज रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधानसभेसंदर्भात विविध विषयावर माहिती दिली. केंद्रीयमंत्र्यांनी यावेळी राज्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला, अशी माहिती ॲड.नार्वेकर यांनी भेटीनंतर दिली.

राहुल नार्वेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

 

Back to top button