करुणा शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला
पुणे : पुढारी वृत्तसेवा: करुणा शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. करुणा शर्मा व तिचा साथीदार यांचे येरवडा पोलिस स्टेशन येथे अॅट्रॉसिटीअंतर्गत तसेच महिलेला धमकावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये करुणा शर्मा ही सध्या येरवडा कारागृहात आहे.
करुणा शर्माच्या वतीने विशेष सत्र न्यायालयात तात्पुरता जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यावेळी पीडित महिलेचे व फिर्यादीचे वकील अॅड. ठोंबरे यांनी करुणा शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज हा कायद्यास धरून नसल्याचे सांगितले व करूणा शर्मा यांच्याविरुद्ध यापूर्वीदेखील अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचा युक्तिवाद केला.