Udaysingh Rajput : शंभर कोटी दिले तरी, शिवसेना सोडणार नाही : उदयसिंग राजपूत | पुढारी

Udaysingh Rajput : शंभर कोटी दिले तरी, शिवसेना सोडणार नाही : उदयसिंग राजपूत

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : मी शिवसेना पक्षामुळे आमदार झालो असून मी शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. मला शंभर कोटी रुपये दिले, तरी मी शिवसेना सोडणार नाही. मी शिवसेना सोबतच असल्याची माहिती कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत (Udaysingh Rajput) यांनी दिली आहे.

शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार गुजरात मधील सुरत येथे जाऊन थांबल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यात कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत (Udaysingh Rajput) हे सुद्धा एकनाथ शिंदेसोबत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकल्या. यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली होती.

याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार राजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेचे मतदान असल्याने माझा मोबाईल बंद होता. यामुळे प्रसार माध्यमातून चुकीच्या बातम्या आल्या. मी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासोबतच वर्षा बंगल्यावर आहे. मला सेनेने उमेदवारी दिली व मी आमदार झालो. मला गद्दारीचा टिळा लावून घ्यायचा नाही. मी सुखरूप शिवसेनेत आहेत. तालुक्यातील जनता व शिवसैनिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला शंभर कोटी रुपये दिले, तरी मी शिवसेना सोडणार नाही. आगामी राजकीय परिस्थिती काय होईल, ते होईल. मी मात्र ज्या पक्षाने मला उमेदवारी देऊन आमदार केले, त्या पक्षाची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याची माहिती आमदार राजपूत यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button