

पुढारी ऑनलाईन डेस्क :
बोगस क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय गुंतवणूकदारांना तब्बल १२८ मिलियन डॉलरचा ( सुमारे १,००० कोटी ) फटका बसला आहे, असा दावा सायबर सुरक्षा कंपनी क्लाउडसेकने ( CloudSEK) केला आहे. अनेक फिशिंग डोमेन आणि अँड्रॉइड आधारित बोगस क्रिप्टो ॲप्लिकेशनच्या समावेश असल्याचा या क्रिप्टो एप्लिकेशनचा पदार्फाश करताना हा खुलासा झाला आहे.
CloudSEK रिपोर्टनुसार, बनावट वेबसाईट 'कॉननए' ही कायदेशीर ब्रिटीशच्या क्रिप्टेकरन्सी व्यवहार करणार्या फ्लॅटफॉर्मची कॉपी करतात. यासंदर्भात बोगस क्रिप्टो करन्सीमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराने CloudSEKशी संपर्क केला. या गुंतवणूकदाराची तब्बल ५० लाख ( सुमारे ६४ हजार डॉलर) रुपयांची फसवणूक झाली आहे.
या फसवणुकीसंदर्भात क्लाउडसेकचे ( CloudSEK) संस्थापक आणि सीईओ राहुल ससी यांनी म्हटलं आहे की, "अशा प्रकारच्या बोगस क्रिप्टो करन्सीमुळे भारतीय गुंतवणूकदारांना तब्बल १ हजार कोटींचा चुना लागला आहे. जेव्हा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळतात याचवेळी यातील घोटाळेबाज आणि फसवणूक करणारे अशा ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधतात. त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांना आमिष दाखवत त्यांची फसवणूक करतात."