Sonalee Kulkarnee : अप्सरा आली! सोनाली कुलकर्णीचा नवा लूक समोर | पुढारी

Sonalee Kulkarnee : अप्सरा आली! सोनाली कुलकर्णीचा नवा लूक समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय जाधव यांच्या आगामी ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarnee) दिसणार आहे. तिने नुकातच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीचा नवा लूक दिसत आहे. तिने काही फोटो इन्स्टाग्रामला शेअर करत या फोटोंना This चोली is love ❤️ अशी कॅप्शन लिहिली आहे. शिवाय यासोबतचं #sonaleekulkarni as #shefali for #tamashalive #incinemas on #15july #kaytamashalavlay #कायतमाशालावलाय #रंगलागला असे हॅश टॅगही दिले आहेत. तिचा हा लूक गाण्यातील असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Sonalee Kulkarnee)

सोनाली कुलकर्णीच्या प्रेमात पुन्हा एकदा चाहते पडले आहेत. मराठी अभिनेत्रीने तिचा पती कुणालसोबत खूप छान वेळ घालवला. सूत्रांच्या माहितीनुसार, “सोनालीने दुबईमध्ये कुणालशी लग्न केले आणि कोरोना काळात तिला तिच्या लग्नाला नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करता आले नाही. त्यामुऴे आता सर्वांच्या उपस्थितीत ती पुन्हा कुणालसोबत लग्न करणार आहे.

तमाशा लाईव्ह या म्युझिकल चित्रपटात तिची शेफाली असे पात्र असल्याचे समजते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील ‘शेफाली’ या सोनाली कुलकर्णीच्या पात्राचा लूक प्रदर्शित केलाय. हा चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित करत आहेत. ‘तमाशा लाईव्ह’१५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे सोनालीच्या इन्स्टा पोस्टनुसार समजते.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. लाल रंगाच्या लहंगा-चोलीत तिचं रुप आणखी खुलंलेल दिसतेय.

याआधी सोनालीने तमाशा लाईव्ह चित्रपटातील तिचा लूक शेअर करत लिहिले होते, ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज घेऊन आलीये शेफाली. ‘तमाशा LIVE’ १५ जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी व्हाईट ब्लेझरमध्ये दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button