गडचिरोली : सरपण आणण्यासाठी गेलेला एकजण वाघाच्या हल्ल्यात ठार | पुढारी

गडचिरोली : सरपण आणण्यासाठी गेलेला एकजण वाघाच्या हल्ल्यात ठार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एकाला वाघाने ठार केल्याची घटना आज (दि.१६) सकाळी साडेआठच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे घडली. वासुदेव मुरलीधर मेश्राम (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

वासुदेव मेश्राम यांचा मृतदेह आढळून आल्याने नागरिक भयभित झाले आहेत. दरम्यान, हल्ला करणारा वाघ ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून आलेला असून त्याने त्या भागात अनेक नागरिकांना ठार केले आहे. या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची चमू लवकरच दाखल होणार असल्याची माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button