COVID19 cases : रुग्‍णसंख्‍येचा आलेख वाढताच ; ८ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, १० जणांचा मृत्‍यू | पुढारी

COVID19 cases : रुग्‍णसंख्‍येचा आलेख वाढताच ; ८ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, १० जणांचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
मागील २४ तासांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येमधील वाढ कायम राहिली. ( COVID19 cases) देशभरात ८ हजार ८४ नवे रुग्‍ण आढळले. तर १० जणांचा मृत्‍यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिली. देशातील काेराेना रुग्‍णसंख्‍याचा आकडा ४७ हजार ९९५ झाला आहे.

COVID19 cases : २४ तासांमध्‍ये ४ हजार ५९२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त

देशातील दैनंदिन पॉझिटीव्‍ही रेट हा तीन टक्‍क्‍यांवर गेला असून, तो मागील चार महिन्‍यांनंतर वाढला आहे. मागील २४ तासांमध्‍ये ४ हजार ५९२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. आतापर्यंत देशात ४ कोटी २६ लाख ५७ हजार ३३५ रुग्‍ण कोरोनातून बरे झाले आहेत.

महाराष्‍ट्रात रविवारी २ हजार ९४६ नवे रुग्‍ण आढळले. तर दोघांचा मृत्‍यू झाला होता. महाराष्‍ट्रात कोरोनाने आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८७० जणांचा बळी घेतला आहे. मुंबईत मागील २४ तासांमध्‍ये १ हजार ८०३ नवे रुग्‍ण आढळले. येथे १६ हजार ३७० रुग्‍णांवर उपचार सुरु असल्‍याचे आरोग्‍य विभागाने स्‍पष्‍ट केले आहे.

Back to top button