नगर: विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस सक्तमजुरी | पुढारी

नगर: विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस सक्तमजुरी

नगर, पुढारी वृत्तसेवा: सावेडी भागातील तरुणीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात विषेश जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी आरोपीला दोषी धरीत सहा महिने सक्तमजुरी व 16 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. नुकसान भरपाईपोटी दंडातील 8 हजारांची रक्कम फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

फैजान कलमी बागवान (रा. धरती चौक, पारशाखुंट, नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 10 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी आरोपी पीडितेच्या घराच्या मागील दरवाजाने घरात जावून त्याने अश्लिल हावभाव केले. पीडितेने आई-वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने घराचा मुख्य दरवाजा जोरात ढकलून, हातात कुर्‍हाड घेऊन घरात प्रवेश केला. माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असे म्हणाला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या डोक्यात कुर्‍हाड मारली.

नगर: भोसले आखाड्यातच पाच मजली हॉस्पिटल; उभारणीचे अडथळे संपले

आजी सोडविण्यासाठी गेली असता आरोपी तिला ढकलून दिले. आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.

Back to top button