सांगली : विभुतवाडी येथील भीषण अपघातात साताऱ्यातील तिघांचा मृत्यू | पुढारी

सांगली : विभुतवाडी येथील भीषण अपघातात साताऱ्यातील तिघांचा मृत्यू

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे कराड – पंढरपूर महामार्गावर ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीनजण ठार झाले. महेश फडतरे (वय २७) गणेश फडतरे आणि निशांत फडतरे (सर्व रा. पुसेगांव, ता. खटाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.

जळगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खासदारांसमोर आक्रोश; खा. रक्षा खडसेंकडून पाहणी

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री कराड पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी गावाच्या पश्चिमेला सातारा जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढा आणि वळण रस्त्यावर हा अपघात झाला. कोरेगाव येथून छोटा टेम्पो (क्रमांक एम एच ०५ बी एच ३४१४) मालाची डिलिव्हरी करून परत निघाला होता. तर, सातारा येथून दिघंचीकडे बोरवेल ट्रक निघाला होता. यावेळी या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

पुणे : खेड शिवापूर येथे अपघातात दोन ठार; एक जण गंभीर जखमी

या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना ग्रामस्थांनी बाहेर काढले. गंभीर जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मायणी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला. दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. तर निशांत फडतरे हा सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघातात मयत झालेले तिघेजण पुसेगावचे आहेत. शेतकरी कृषी यंत्र एजन्सीचे साहित्य पोहोचवुन ते परत निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

विभूतवाडी ब्लाइंड स्पॉट

विभूतवाडी मार्गे साताऱ्याकडे जाताना ओढा पात्रातील पुलावरून जाताना वळण रस्ता आहे. या ठिकाणी अनेकवेळा भीषण अपघातात अनेक लोकांचे बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघाताची तत्काळ दखल घ्यावी आणि वळण रस्ता सरळ करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

विभूतवाडी ग्रामस्थांचा प्रामाणिकपणा

गुरुवारी रात्री अपघात ग्रस्त वाहनांतील जखमींना बाहेर काढताना एका वाहनातून ग्रामस्थांना ३२ हजार रुपयांची रक्कम सापडली. मदती दरम्यान सापडलेली ही रक्कम ग्रामस्थांनी वाहन मालकाला परत दिली. या कृतीतून विभूतवाडी ग्रामस्थांकडून माणुसकीचे दर्शन दिसून आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button