Nana Patole : मोहन भागवतांच्या ‘भारत जोडो’ समर्थनाचे काँग्रेसकडून स्वागत | पुढारी

Nana Patole : मोहन भागवतांच्या ‘भारत जोडो’ समर्थनाचे काँग्रेसकडून स्वागत

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘भारत जोडो’ या वक्तव्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या समर्थनाचे काँग्रेसकडून स्वागतच आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी ( दि.३) अमरावतीत केले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित धनगर मेळाव्याकरिता आले असता पटोले पत्रकारांशी बोलत होते.

(Nana Patole) सोनिया गांधी यांनी उदयपूर येथे भारत जोडोचे आवाहन केले, धर्मांध व्यवस्था मोठ्या प्रमाणात देशात फोफावली आणि त्यात देशाची मोठ्या प्रमाणात बदनामी तसेच नाचक्की होत होती. भारत जोडोच्या दृष्टिने देशात प्रयत्न व्हावे आणि त्यादृष्टीने कालच मोहन भागवत यांनी एक व्यक्तव्य केले. सोनिया गांधी यांनी केलेल्या व्यक्तव्याचे एकप्रकारे मोहन भागवत यांनी समर्थनच केले आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आणि देशहिताची भूमिका मांडली म्हणून त्याचा मनापासून आनंद आहे. पण खरे तर मोहन भागवत यांनी सांगितले, ते अंमलात आले पाहिजे.

Nana Patole : शेतकरी मदतीची भूमिका घ्यावी

महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ती कृत्रिम आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा तो परिणाम आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्याचही चिंता व्यक्त व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी चांगले कायदे व्हायला पाहिजे, शेतकरी ताटमानेने राहिला पाहिजे. देशाच्या अन्नदाता ज्या प्रमाणे डबघाईस आला आहे. आणि केंद्रीय व्यवस्थेने शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या उद्योजक मित्रांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यापेक्षा शेतकरी हिताचे निर्णय तेथे व्हावे, अशी भूमिका घेतली पाहिजे. देशाच्या सीमा असुरक्षित आहे आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थाचा रोज ढाचा पाडण्याचा काम केले जात आहे. ते थांबविण्याची विनंती मोहन भागवत यांना करणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

चार उमेदवार निवडूण येणार

महाविकास आघाडीकडे सरप्लस मते आहेत. त्यामुळे चार उमेदवार निवडून येतील. सहावा उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल. उमेदवार ठेवायचा की नाही याला जबरदस्ती केली जात नाही. हा त्यांचा विषय आहे. मात्र, बिनविरोध निवडून देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. निवडणूक झाली तरी महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडूण येतील, असे पटोले म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button