रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताने दिला इशारा | पुढारी

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताने दिला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अज्ञाताकडून पुढील २४ तासांत जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञाताने राष्ट्रीय महिला आयोगा ऑफीसमध्ये फोन करुन पुढील 24 तासात जीवे मारू असा इशारा दिला आहे. या धमकीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गेल्‍या काही दिवसांतील हा तिसरा फोन आहे.

महिला आयोगाचा कारभार रुपाली चाकणकर यांनी स्वीकारल्यानंतर अनेक कामे पूर्णस्‍तवास नेले आहेत. राज्‍यांतील महिलांच्या बाबतीत होणा-या घटना – घडामोडींवर त्‍या तात्‍काळ दखल घेतात. रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन कॉल आल्‍याने एकच खळबळ उडाली आहे. तर त्‍यांना यावूर्पी असे धमकी देण्याचे प्रकार घडले होते. परंतु त्‍यांनी याला भीक घातली नाही.

महिला आयोगाने या प्रकरणाबाबत गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलिसांना याबद्दल तातडीने माहिती देण्यात आली आहे. यानंतर तात्‍काळ रूपाली चाकणकर यांना कोणी फोन केला याचा तपास पोलीस करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत हुकमी एक्का म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे पाहिले जात आहे. रस्त्यावरची आंदोलने ते व्यासपीठावरील भाषणे तर हजारोंच्या गर्दीत त्‍याचे वेगळेपण दिसून येते. त्‍यांच्याकडून एखाद्या विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, धडाडीपणा, आणि विरोधकांना सडोतोड उत्‍तर देणे अशा अनेक कारणाने त्‍या त्‍यांची वेगळी ओळख आहे.

हेही वाचा  

Back to top button