भाजपनं संभाजीराजेंची ढाल करुन स्वतःचा उमेदवार उतरवला, संजय राऊतांचा आरोप | पुढारी

भाजपनं संभाजीराजेंची ढाल करुन स्वतःचा उमेदवार उतरवला, संजय राऊतांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपने संभाजीराजेंना फसवलं असून त्यांचा पक्षाने ढाली सारखा वापर केला आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.३०) केला.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणात घमासान सुरु झाल्याचे चित्र काही दिवसांपासून आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या राजकारणामध्ये मात्र मराठा आंदोलनाचे नेते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट झाला. संभाजीराजेंनी शिवसेना पक्ष प्रवेश नाकारला आणि त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता .

आमचं ठरलंय; हे चालणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

दरम्यान, भाजपने कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी घोषित केली. या मुद्यावरून बोलताना राऊतांनी ‘भाजपने स्वतःच्या उमेदवारासाठी संभाजीराजेंचा ढाली प्रमाणे वापर केला, पक्षांना त्यांना फसवलं’ असा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘काँगेसने राज्यातील उमेदवार दिला असता तर बरे झाले असते’ अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे वाचलंत का?

Back to top button