मुंबई : दुचाकीवर मागे बसणार्‍यालाही हेल्मेट बंधनकारक | पुढारी

मुंबई : दुचाकीवर मागे बसणार्‍यालाही हेल्मेट बंधनकारक

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबईमध्ये दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीबाबत नवीन नियम जारी करण्यात आला आहे.  दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार आहे. 15 दिवसांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबई वाहतूक पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार 500 रूपये दंड आणि 3 महिन्यांसाठी वाहन चालवण्याचा परवाना रदृ करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दुचाकी अपघातात डोक्याला मार लागून दुचाकीस्वार दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत दुचाकीच्यामागे बसणार्‍या व्यक्तीला दंड आकारला जात नव्हता. पण आता नव्या नियमावलीनुसार मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घातले नसेल तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

रस्ता सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून मुंबईमध्ये मागील काही दिवसांत वाहतकीचे अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच विरूद्ध दिशेने गाडी चालवणार्‍यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली.

हेही वाचा  

Back to top button