ताडोबातील सर्वात वयस्कर ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू | पुढारी

ताडोबातील सर्वात वयस्कर ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघडोह या वाघाचा सोमवारी (दि. 23) सकाळी मृत्‍यू झाला. तर ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाघडोह हा सर्वात वयस्क वाघ होता.

वनविभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी या वाघाने सिनाळा येथील गुराख्यावर हल्ला केला होता. यामध्ये गुराचयाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेपासून या वाघावर लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती, अशातच सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर त्‍याला शिकार करणे ही अशक्य होते. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. हा वाघडोह माणसे आणि पाळीव प्राण्यासाठी धोकादायक असू शकतो ही शक्यता वनविभागाकडून वर्तवण्यात आली होती.

हेही वाचा  

Back to top button