बारामतीत लाचप्रकरणी हवालदाराला अटक: होमगार्डवर गुन्हा दाखल | पुढारी

बारामतीत लाचप्रकरणी हवालदाराला अटक: होमगार्डवर गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले (वय ४९) व होमगार्ड सनी शामराव गावडे या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील उगले यांना अटक करण्यात आली आहे. एका वाॅरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती.

पुणे : व्हिडीओ व्हायरलची धमकी देत मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार करून उकळली खंडणी

तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, वाॅरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले होते. ५ व ६ मे रोजी एसीबीने या प्रकाराची पडताळणी केली होती. या कामी उगले याने लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार सोमवारी (दि. २३) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

Back to top button