IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी रोहीत-कोहलीला विश्रांती, के.एल. राहुल कर्णधार | पुढारी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी रोहीत-कोहलीला विश्रांती, के.एल. राहुल कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत वि. दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, के. एल. राहुल यांच्‍याकडे कर्णधारपदाची धुरा देण्‍यात आली आहे. (IND vs SA)

द. आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (IND vs SA)

केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत ( उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक (IND vs SA)

भारत वि. दक्षिण आफ्रिक टी-20 मालिका (IND vs SA)

पहिला सामना – ९ जून, दिल्ली
दुसरा सामना – १२ जून, कटक
तिसरा  सामना – १४ जून, विशाखापट्टनम
चौथा  सामना – १७ जून, राजकोट
पांचवा  सामना – १९ जून बेंगलोर

उमरान मलिक- अर्शदीप सिंग यांना संधी

आयपीएलमध्ये पदार्पण करताच आपल्या वेगवान गोलंदाजीचा करिश्मा दाखवलेल्या उमरान मलिकला भारतीय संघात संधी मिळाली आहे. उमरानबरोबरच अर्शदीप सिंगलाही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संधी मिळाली आहे. भारतीच्या टी-२० संघात अनेक दिग्गजांनी पुन्हा एकदा संघात स्थान मिळवले आहे. हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल यांनी पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button