Australia Election : अँथनी अल्‍बानीज होणार ऑस्‍ट्रेलियाचे नवे पंतप्रधान | पुढारी

Australia Election : अँथनी अल्‍बानीज होणार ऑस्‍ट्रेलियाचे नवे पंतप्रधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. ऑस्ट्रेलियन जनतेने विद्‍यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना धक्का दिला आहे. आत्तापर्यंतच्या निकालानुसार अँथनी अल्बनीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानपद भूषवतील हे अआता निश्चित झाले आहे. (Australia Election)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले की, मी आज रात्री विरोधी पक्षाचे नेते आणि आत्ता होणारे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Australia Election)

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, स्कॉट मॉरिसन यांचे सरकार हवामान बदल आणि लैंगिक छळ यांच्यासारख्या अनेक प्रश्नांवर चांगले काम करू शकले नाही. ऑस्ट्रलियात १.७१ कोटी मतदारांपैकी ४८ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सुरवातीलाच मतदानाचा हक्क बजावला होता. आणखी दोन आठवडे पत्रांद्वारे मतदान स्वीकारणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (Australia Election)

हेही वाचलंत का?

Back to top button