Paloma Thakeria : कोण आहे पलोमा ठकेरिया? सनी देओलचा मुलासोबत बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू | पुढारी

Paloma Thakeria : कोण आहे पलोमा ठकेरिया? सनी देओलचा मुलासोबत बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) चा धाकटा मुलगा राजवीर देओल (Rajveer Deol)सोबत अभिनेत्री पलोमा ठकेरिया (Paloma Thakeria) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राजवीरसोबत पलोमाचा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार असून, या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. यामुळे जाणून घेवूयात पलोमा ठकेरिया हिच्याविषयी….

राजवीर आणि पलोमा ठकेरिया (Paloma Thakeria) यांना राजश्री प्रॉडक्शनने मुख्य भूमिकेसाठी साइन केले असल्याची माहिती सुत्राकडून मिळालेली आहे. हा चित्रपट लववकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस  हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. आहे. राजवीर देओल आणि पलोमा या चित्रपटातून दोघांचा पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये डेब्यू आहे.

राजवीरसोबत पडद्यावर दिसणारी पलोमा कोण आहे?

एकेकाळी आपल्या सौंदर्याने असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री पूनम धिल्लन आणि निर्माता अशोक ठकेरिया यांची पलोमा ही मुलगी आहे. पलोमाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. यानंतर ती फिल्मी जगताकडे वळली.

पलोमाच्या इंन्स्टाग्रामवर नवनविन हटके फोटो पाहायला मिळतात. ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून तिचे ५३ हजारांहून अधिक फोलोव्हर्स आहेत. याशिवाय ती वेळात वेळ काढून वर्क आऊट करत असते. सोशल मीडियावरील फोटोत ती कमालीची सुंदर आणि हॉट दिसते. तिचा आगामी चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. अद्याप चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अवनीश यांनी सांगितले की, ‘पलोमा एक उत्तम कलाकार आहे आणि पडद्यावर तिची एन्ट्री जबरदस्त आहे. तिच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे. या चित्रपटात प्रेमसंबंधांची कथा, त्यांची गुंतागुंत आणि साधेपणा दाखवण्यात येणार आहे. राजश्री फिल्म्स नेहमीच नवीन कलागुणांना संधी देत असते. राजश्रीने आजपर्यंत अनेक नामवंत स्टार्सना यशस्वी केले आहेत. चित्रपटात राजवीर आणि पलोमा यांची मुख्य भूमिका आहे. असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

View this post on Instagram

A post shared by Paloma 🧿 (@palomathakeriadhillon)

Back to top button