पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात राजस्थान संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) यांच्या नावावर नवा विक्रमाची नोंद झाली आहे. यंदा चहलने आपल्या फिरकीने अनेक खेळाडूच्या दांड्या गूल गेल्या. यंदाच्या स्पर्धेतील ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेटने हरवत राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसर्या स्थानावर पोहचला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून नवा विक्रम करण्याची संधी त्याला आहे.
युजवेंद्र चहलने यंदा १४ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहे. त्याने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणार्या इमरान ताहिर याच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. इमरान ताहिर याने आयपीएल २०१९ मध्ये १७ सामन्यात २६ विकेट घेतल्या होत्या. यंदा युजवेंद्र चहल याने केवळ १४ सामन्यात ही विक्रमी कामगिरी केली आहे.
राजस्थानच्या यशामध्ये चहलचे मोठे योगदान आहे. यंदाच्या हंगामात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच आजपर्यंतचा सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाजही ठरला आहे. आता गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या संघाला फ्ले ऑफमध्ये दोन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये एक विकेट घेण्यास चहल याला यश आल्यास तो एका हंगामात आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नावावर नामुष्कीजनक रेकॉर्डची नोंद झाली आहे. यंदा चेन्नईचा एकही फलंदाज ४०० पेक्षा अधिक धावा करु शकला नाही. चेन्नईसाठी एका हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैना याच्या नावावर आहे. त्याने २००८ ते २०१४ या कालावधीतील प्रत्येक सीजनमध्ये ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने २०१८च्या हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या।. रैना नंतर महेंद्रसिंह धोनी याने २००८, २०१३, २०१८, २०१९ या हंगाता ४०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
हेही वाचा :