फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स | पुढारी | पुढारी

फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स | पुढारी

यावेळचा ‘चकाकता हिरा’ म्हणून ‘फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स’ या कंपनीचा परामर्श घेतला आहे. या शेअरचा सध्या भाव 396 रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात तो 500 रुपयांपर्यंत जाईल. पुढील दोन वर्षात कंपनीची विक्री वार्षिक 15 टक्के चक्रवाढ दराने होईल. पण नफा मात्र दर वर्षी 45 टक्क्याने वाढेल असा अंदाज आहे. तिच्या लोकप्रिय ब्रँडस्मध्ये ली कपूर, कॉन्व्हर्स, इंडिगो नेशन, जॉन मिलर, जेलस 21, चॅम्पियन, उंबरो हे ब्रँडस् आहेत. सप्टेंबर 2018 तिमाहीसाठी कंपनीचा व्यवहार 1222 कोटी रुपयांचा होता. सप्टेंबर 2017 तिमाहीसाठी तो 1022 कोटी रुपयांचा होता. सप्टेंबर 2017 तिमाहीत ढोबळ नफा 94.23 कोटी रुपये होता व नक्‍त नला 25.54 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2018 तिमाहीसाठी शेअरमागे उपार्जन या तिमाहीसाठी 1.33 रुपया होते. गेल्या या तिमाहीसाठी ते 1.23 होते. या वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत कंपनीने 7 नवीन दुकाने उघडली. आता मध्यवर्ती दुकानांची संख्या 43 झाली आहे आणि फॅक्टरी ब्रँड दुकानांची संख्या 76 झाली आहे. या तिमाहीत कंपनीने त्रिवेंद्रम् व म्हैसूरमध्ये 2 दुकाने उघडली. या सहामाहीत कंपनीने बंगलोर, सालेम, झिराखपूर, बडोदा, आग्रा आणि पाटणा इथे नवीन दुकाने उघलडी आहेत. कंपनीकडे आता 25च्या वर ब्रँडस आहेत. तिच्या दुकानांनी एकूण 50 लाख स्क्‍वेअर फुटाची जागा व्यापली आहे. कंपनीचे भाग भांडवल 38.90  कोटी रुपये आहे व गंगाजळी 1355 कोटी रुपये आहे.

मार्च 2018 वर्षासाठी कंपनीची विक्री 4219 कोटी रुपये होती. मार्च 19 व मार्च 20 वर्षासाठी ती अनुक्रमे 5020 कोटी रुपये व 5773 कोटी रुपये होईल. नक्‍त नफा मार्च 2017 मध्ये 155.75 कोटी रुपये होता. 2018 मध्ये जास्त कर द्यावा लागल्यामुळे 110 कोटी रुपयांवर आला. मार्च 2020 वर्षात तो 130 कोट रुपये व्हावा असा अंदाज आहे. मार्च 2017 ते मार्च 2020 या चार वर्षांसाठी प्रत्यक्ष व संभाव्य शेअरगणिक उपार्जन  अनुक्रमे 8.2 रु. 5.8 रु. 6.5 रु. व 6.70 रु. होईल. आता भारताने 2022 पूर्वी अवकाशात ‘गगनयान’  पाठवण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी केंद्र मंत्रिमंडळाने 10000 कोटी रुपयांच्या खर्चाला शुक्रवारी 28 तारखेला मान्यता दिली. गगनयानात तीन अंतराळवीर असतील तसेच इस्रोने फ्रान्सबरोबर सहकार्य करायचे ठरवले आहे. अंतराळात हॉस्पिटल उभारण्याचीही त्यात कल्पना आहे. या गगनयानामुळे अंतराळात मानव पाठवणारा भारत चौथा देश ठरेल. 2018 मार्चमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मार्कोन भारतात आले तेव्हा या सामंजस्य कराराची बिजे रोवली गेली होती. संरक्षण, अंतराळ व आण्विक कार्यक्रमात भारताने अमेरिका व रशियाबरोबर असे सहकार्य सुरू केले आहे. फ्रान्स हा तिसरा देश असे करार करणार्‍यात ठरणार आहे. 

Back to top button