चहासोबत ‘हे’ खाऊ नये… | पुढारी | पुढारी

चहासोबत ‘हे’ खाऊ नये... | पुढारी

नवी दिल्‍ली ” चहा हे आता वैश्‍विक पेय बनलेले आहे. मात्र, नुसताच चहा पिणे अनेकांना आवडत नाही. चहा पिण्यापूर्वी, पीत असताना किंवा त्यानंतरही अनेक पदार्थ खाल्‍ले जात असतात. त्यापैकी कोणत्या पदार्थांमुळे आरोग्याची हानी होऊ शकते हे पाहणेही गरजेचे ठरते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा पिल्यावर लगेचच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यामधील रासायनिक घटकांची ‘रिअ‍ॅक्शन’ झाल्यास पोटाला त्रास होतो. गॅसेस, आंबट ढेकर किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात. ज्या पदार्थांमध्ये आयर्न म्हणजेच लोह असते ते चहासोबत घेऊ नयेत. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असते. हे दोन्ही पदार्थ शरीरात आयर्नचे शोषण होण्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे चहा पीत असताना हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आदींपासून बनलेले पदार्थ टाळावेत. बरेचसे स्नॅक्स बेसनपासून बनवलेले असतात. काहींना चहाबरोबर भजीही खाणे आवडते. (विशेषतः पावसाळ्यात!) मात्र बेसनचे कोणतेही पदार्थ चहासोबत खाऊ नये. यामुळे पदार्थाची पौष्टिकताही कमी होते आणि अपचनासारखा त्रासही उद्भवतो! चहा पिल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा पिल्यावर लगेचच पाणी पिल्याने किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो व पचनशक्‍ती कमजोर होते. त्यामुळे मळमळ, पित्त व अपचनाचा त्रास होतो.

 

Back to top button