शेतात भगदाड पडून निर्माण झाले तळे! | पुढारी

शेतात भगदाड पडून निर्माण झाले तळे!

मेक्सिको सिटी : आपल्याकडे शेतीला चांगला पाणीपुरवठा व्हावा यासाठी शेततळ्यांची संकल्पना निर्माण झाली. मात्र, एखाद्या शेतात मोठे भगदाड पडून आपोआपच तळं निर्माण झालेलं कुणाच्या ऐकिवातही नसेल. असा प्रकार मेक्सिकोमध्ये घडला आहे. तिथे प्याब्ला राज्यातील एका शेतात 300 फूट रुंदीचा खड्डा पडला. एका रात्रीत निर्माण झालेल्या या तळ्यात भूगर्भातील पाणी साठत जाऊन आता एक तळंच निर्माण झाले आहे!

काही दिवसांपूर्वीच या शेतात आधी 15 फुटांचा खड्डा पडला होता. शेतातील जमीन मऊ झाल्याने असा प्रकार घडला असावा असे आधी तेथील लोकांना वाटले. मात्र, हळूहळू हा खड्डा मोठा होत गेला आणि त्यामध्ये पाणी साठत गेले. सुरुवातीला या शेतात राहणार्‍या लोकांना पहाटे सहा वाजल्यापासून भूकंप झाल्यासारखा आवाज ऐकू येत होता. त्यांनी नंतर पाहिले की जवळच एक तळे निर्माण झाले असून त्यामधील पाणी उसळी घेत आहे. पाण्याच्या मार्‍याने तळ्याचे काठ कोसळून ते आणखी मोठे होत होते. मेक्सिकोचे पर्यावरण सचिव आणि प्याब्ला राज्याचे राज्यपालही या भगदाडामुळे चिंतेत पडले. या शेतात राहणार्‍या कुटुंबाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही अन्यत्र हलवण्यात आले.

 

Back to top button