मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का? | पुढारी

मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

सेक्स हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. त्याच बरोबर हस्तमैथुन हाही एक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे असं लैगिक समस्या तज्ज्ञ सांगत असतात. मात्र, मुलामुलींच्या हस्तमैथुन करण्याने विवाहानंतर देखील त्यांना फायदा होतो का? याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

विवाहपूर्व हस्तमैथुन केले तर विवाहानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होते का?

मधुमेहामुळे सेक्सवर परिणाम होतो का?

सेक्स करताना कंडोम फाटला तर..!

पहिला संभोग करताना कोणत्या अडचणी येतात?

डॉ. राहुल पाटील सांगतात की, साधारण हस्तमैथुन हे एकटेच आणि अविवाहित असताना करायचे असते असे समजले जाते. परंतु पार्टनर सोबत असताना देखील हस्तमैथुन किंवा एकमेकांचे हस्तमैथुन करून सेक्समधला आनंद मिळवता येतो. विवाहापूर्वी हस्तमैथुन केले की सेक्स जीवनात त्याचा उपयोग कामपूर्ती मिळवण्यासाठी खूप होत असतो. शरीरावरील कामुक केंद्रे दोघांना समजतात आणि कामपूर्ती, वासना वाढवण्यासाठी फायदा होतो. जे पूर्वी करत नाहीत त्यांना स्वतः वासना शमविण्यासाठी अडचणी येतात. हस्तमैथुनाबद्दल गैरसमज असलेले लोक जीवनात एकटे असतील तर सेक्स आणि हस्तमैथुनपासून वंचित राहतात. वासना शमवित नाहीत त्यामुळे चिडचिड वाढते, काहींना झोप येत नाही. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होऊ शकतो. हस्तमैथुनाचे फायदे आहेतच. खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका.   

हस्तमैथुन आणि मुलींबद्दल आकर्षण कमी करण्यासाठी काय करता येईल?

डॉ. पाटील सांगतात की, दुसऱ्या कामात मन गुंतवणे, छंद जोपासणे हे उपाय म्हणता येतील. पण वयात आल्यावर हस्तमैथुन करावेसे वाटणे आणि सेक्ससाठी विरुध्दलिंगी आकर्षण निर्माण होणे मुळात गैर नाही. ते सगळे थांबवणे असे वाटण्यामागे वीर्यपतन म्हणजे वाईट असते असे विचार असतील तर त्यावर लैंगिक शिक्षण देणे हा खरा उपाय आहे, अशीही त्यांनी माहिती दिली.

Back to top button