अवैध खणन घोटाळाप्रकरणी ईडीचे पाच राज्यात छापे | पुढारी

अवैध खणन घोटाळाप्रकरणी ईडीचे पाच राज्यात छापे

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : अवैध खणन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने शुक्रवारी पाच राज्यात छापे (ED raids) टाकले. ज्या राज्यात हे छापे टाकण्यात आले आहेत, त्यात झारखंड, राजस्थान, हरियाणा, प. बंगाल यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूण १८ ठिकाणी ईडीची कारवाई सुरु असल्याचेही समजते.

दिल्लीहून आलेल्या ईडीच्या पथकाने झारखंडमधील रांची येथे आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानावर छापा  (ED raids) टाकला आहे. याशिवाय अमित अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या ठिकाणांवरही ईडीची कारवाई सुरु आहे. दरम्यान, या छापेमारीवरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन व त्यांच्या कुटुंबियांचा अवैध खणन घोटाळ्यात हात असून राजस्थान आणि मुंबई येथेही ईडीची कारवाई सुरु असल्याचे दुबे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button