स्विस बँकेने भारताला दिली खातेधारकांची माहिती  | पुढारी

स्विस बँकेने भारताला दिली खातेधारकांची माहिती 

नवी दिल्ली/बर्न : वृत्तसंस्था

स्विस बँकांत पैसे ठेवणार्‍या भारतीयांच्या खात्यांबाबतची माहिती भारताला प्राप्त होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्वयंचलित माहिती आदान-प्रदान व्यवस्थेनुसार या महिन्यात स्वित्झर्लंडने पहिल्यांदा काही माहिती भारताला उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्‍लेषणाची तयारीही भारताने सुरू केली आहे.

प्राप्त माहितीमध्ये खातेधारकांची ओळख पटण्यासाठीच्या आवश्यक बाबी अंतर्भूत असल्याचा अंदाज लावला जात आहे. बँका आणि नियामक संस्थांच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की काही लोकांनी कारवाईच्या भीतीने स्विस बँकांतील खाती गोठवली होती आणि प्राप्त माहिती अशा खात्यांशीही निगडित आहे. साहजिकच दडपण्याचा प्रयत्न केलेली अनेक रहस्ये आता उघडकीला येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या निर्देशाबरहुकूम तिथल्या बँकांनी डेटा एकत्रित केलेला आहे आणि भारताच्या सुपूर्द केलेला आहे. 2018 या वर्षात एकदा जरी एखादे खाते सक्रिय झालेले असेल, तर त्याचीही संपूर्ण माहिती आम्हाला मिळालेली आहे, असेही या अधिकार्‍यांनी सांगितले. 

Back to top button