भारताच्या आणखी एक शेजारी देशाला लालूच दाखवण्याचा चीन्यांकडून डाव सुरु! | पुढारी

भारताच्या आणखी एक शेजारी देशाला लालूच दाखवण्याचा चीन्यांकडून डाव सुरु!

कोलंबो : पुढारी ऑनलाईन

लडाखमध्ये सुरू असलेल्‍या भारत-चीन मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चीनकडून भारताला सर्व बाजूंनी घेरण्याच्या दृष्‍टीने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आल्‍या आहेत. एका बाजूला नेपाळसारखे इवलेसे राष्‍ट्र चीनच्या सावलीखाली येउन भारताला डोळे वठारत आहे, तर दुसरीकडे पाकिस्‍तानकडून नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात सतत युद्धबंदीचे उल्लंघन सुरू ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता चीनने बांग्‍लादेश आणि श्रीलंकेवर आपले जाळे टाकण्यास सुरूवात केली आहे. यासाठी आर्थिक आणि डोनेशन कुटनितीचा अवलंब करण्यात येत आहे. 

श्रीलंकेला जूनमध्ये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी चीनकडून फेस मास्‍क आणि अनेक वैद्यकीय उपकरणे चीनकडून मिळाली. हे याचेच घोतक आहे की, श्रीलंका बीजिंग च्या विदेश निती आणि देणगी कुटनितीचा एक महत्‍वपूर्ण हिस्‍सा झाला आहे. श्रीलंकेला आर्थिक कर्जाच्या बोजाख्याली दाबल्‍यानंतर आता चीनकडून स्‍वत:च विषाणू पसरवून आता उपचारासाठी पुढे सरसावण्याची चाल खेळत आहे. 

हिंद महासागरात चीनच्या विस्‍ताराचे श्रीलंका केंद्र 

चीनची इंडो पॅसिफिक एक्‍सपेंशन आणि बेल्‍ट अँन्ड रोड इनिशिएटिव्ह (बिआरआय) मध्ये चीनने श्रीलंकेलाही सामील करून घेतले आहे. श्रीलंकेने चीनचे कर्ज फेडू न शकल्‍याने आपले हंबनटोटा हे बंदर चीनच्या मर्चंट पोर्ट होल्‍डिंग्‍स लिमिटेड कंपनीला १.१२ अरब डॉलर २०१७ मध्ये ९९ वर्षांसाठी लीजवर देण्यात आली आहे. मात्र श्रीलंकेला हे पोर्ट आता पुन्हा हवे आहे. 

अमेरिकेसोबतचे संबंध श्रीलंकेने केले कमी…

२०१७ च्या आधी श्रीलंका आणि अमेरिकेमध्ये घनिष्‍ठ संबंध होते. या दरम्‍यान अमेरिकी समर्थक सिरिसेना-विक्रीमेसिंघे प्रशासनाने अमेरिके सोबत Acquisition and Cross-Servicing Agreement (ACSA) ला पुढच्या १० वर्षांसाठी वाढवले होते. यामुळे अमेरिकेला हिंदी महासागर क्षेत्रात ऑपरेशनसाठी रसद मिळवण्यासाठी, इंधन भरण्यासाठी तसेच थांबण्यासाठी सुविधा निर्माण झाली होती. मात्र आता गोटबाया प्रशासनाने अमेरिकेसोबतचे आपले संबंध कमी केले आहेत.  

महिंद्रा राजपक्षेंच्या कार्यकाळात चीनशी जवळीक वाढली…

महिंद्रा राजपक्षे यांच्या कार्यकाळात श्रीलंका आणि चीनमध्ये संबंधात सुधारणा झाली. श्रीलंकेने विकासाच्या नावावर चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. मात्र ते फेडण्याची वेळ आली तेंव्हा श्रीलंकेकडे तेवढी ताकद नव्हती. ज्‍यानंतर हंबनटोटा पोर्ट आणि १५ हजार एकर जागा एका औद्योगिक झोनसाठी चीनकडे सोपवावी लागली. आता शंका व्यक्‍त केली जात आहे की, हिंद महासागरामध्ये आपल्‍या हालचाली सुरू ठेवण्यासाठी चीन याचा नेव्ही बेससारखा वापर करू शकते. 

गोटभाया राजपक्षे यांच्या सत्‍तेत येताच समीकरणे बदलली…

२०१९ मध्ये जेंव्हा श्रीलंकेच्या राजकारणात गोटभाया राजपक्षे यांनी सत्‍तेची सूत्रे स्‍विकारली तेंव्हा पासून चीन सोबतच्या संबंधामध्ये कमी आली आहे. याचे कारण म्‍हणजे श्रीलंकेला भिती आहे की, जर आपण चीनकडून कर्ज घेत राहिलो, तर श्रीलंका ड्रॅगनच्या सॅटेलाईटचा देश होउन बसेल. 

Back to top button