Sai Lokur : गोव्यात सईचा स्वीमसूटमध्ये हटके स्टाईल (Video) | पुढारी

Sai Lokur : गोव्यात सईचा स्वीमसूटमध्ये हटके स्टाईल (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. सई लोकूरने (Sai Lokur) आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांनाच मोहून टाकलंय. ती नेहमीच ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर सईचे (Sai Lokur) आता काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती गडद गुलाबी रंगाच्या शॉर्टमध्ये दिसतेय. ती पुलमध्ये एन्जाय करताना दिसतेय. स्वीमसूट लूकमध्ये तिचा बोल्ड लूक दिसतेय.

सईने खूप सारे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. सईने एक व्हिडिओही शेअर केला आहे. काही फोटोंना तिने The Pink Mermaid 🧜‍♀️ अशी कॅप्शन लिहिले. Rejoicing life. Living every moment.

सई ही टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता पुष्कर जोगसोबतच्या तिच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती. कॉमेडियन कपिल शर्माच्या किस किस को प्यार करू या हिंदी चित्रपटातही तिने काम केले होते.

तिने मिशन चॅम्पियन या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. हा चित्रपट तिची आई वीणा लोकूर यांनी दिग्दर्शित केलं होतं. अभिनेत्री म्हणून सई सर्वांना माहिती आहे. पण खूप जणांना माहिती असेल की, सई एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. तसेच सईने पोहण्याचेही शिक्षण घेतले आहे.

ही बेळगावची कन्या बेंगलोरची सून झालीय. सईने ३० नोव्हेंबर रोजी तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

Back to top button