बहाद्दराने तब्बल एक कोटीची मर्सिडीज पेटवून खाक केली आणि बघत बसला! (video) | पुढारी

बहाद्दराने तब्बल एक कोटीची मर्सिडीज पेटवून खाक केली आणि बघत बसला! (video)

एका रशियन यूट्यूबरने आपल्‍या १ कोटी रूपयाच्या मर्सिडीज कारला आग लावली. त्‍याच्या या भलत्‍या कर्तृतीचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना प्रथम धक्‍काच बसला आहे. इतकी महागडी कार कोणी जाळून टाकत का? असा प्रश्न नागरिकांना पडला. या यूट्यूबरला Misha किंवा Litvin म्‍हटले जाते. ज्‍याचे यूट्यूबवर जवळपास ५० लाख सबस्‍क्राइब्‍स आहेत इन्स्टाग्रामवर १ कोटी १३ लाख  क ११.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. असा हा व्यक्‍ती १५०,००० डॉलर (11,054,995.45 रुपये) किमतीची मर्सिडीज GT 63S ला पेटवून ट्रेंडवर आहे. हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिलय की, अमेरिकन ब्‍लॉगर्स आयफोन फोडतात तर रशियन ब्‍लॉगर्स मर्सिडीज पेटवतात. व्वा… रे जग।

अधिक वाचा : राज ठाकरे वाढीव वीज बिलासाठी राजभवनावर; राज्यपाल म्हणाले शरद पवारांशी सुद्धा चर्चा करा!

हा व्हिडिओ २४ ऑक्‍टोबरला यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. त्‍याला 11,366,556 व्ह्यूज आणि १० लाख लाईक्‍स मिळाले आहेत.४७ हजार लोकांनी या व्हिडिओला डिस्‍लाईकही केले आहे. दरम्‍यान हा व्हिडिओ शेअर करताना या यूट्यूबरने लिहिताना म्‍हटलय की, मी खूप विचार केला मला या शार्क सोबत काय करायला हवं. माझ्यासाठी आग हीच चांगली कल्‍पना होती. मी आनंदी नाही.

अधिक वाचा : गृहमंत्र्यांकडून कोरोनाग्रस्त आठवलेंना ‘आठवले स्टाईल’ सदिच्छा!

बऱ्याच लोकांच्या मते या यूट्यूबरने आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी हा प्रकार केला आहे. तर एका रिपोर्टने दावा केल्‍यानुसार यूट्यूबरला मर्सिडीजच्या या महागड्या मॉडेलमध्ये अनेक अडचणी येत होत्‍या. या कारला स्‍थानिक मर्सिडीज डिलरशिपकडे पाच वेळा पाठवण्यात आले, मात्र कथीतरित्‍या त्‍याने या कारला ठिक करण्यास नकार दिल्‍याचे बोलले जात आहे. 

अधिक वाचा : नोरा फतेही आणि हार्दिक पांड्याच्या बायकोची भन्नाट नृत्य जुगलबंदी पाहिलात का? (video)

या व्हिडिओमध्ये दिसते की, हा यूट्यूबर आपल्‍या नव्या कोऱ्या मर्सिडीज कारला एका मोकळ्या मैदानात घेऊन येतो. मैदानात मध्यभागी या कारला उभी करतो. कारमधून खाली उतरून तो या कारच्या डिक्‍कीमधून ज्‍वालाग्राही पदार्थांचे अनेक (कॅन) डबे बाहेर काढतो. यानंतर एक-एक कॅन उघडून त्‍यातील ज्‍वालाग्राही द्रव पदार्थ चकचकीत मर्सिडीज गाडीवर ओततो. मग हा यूट्यूबर काही अंतरावर बसून आगीवर सॉसेजिस शिजवतो आणि खात-खात लाईटर पेटवून गवतावर टाकतो, मग काय बघता-बघता आग कारजवळ पोहचते आणि कार पेट घेते. काही वेळातच कार जळून खाक होते. 

अधिक वाचा : बहाद्दराने तब्बल एक कोटीची मर्सिडीज पेटवून खाक केली आणि बघत बसला! (video)

या नंतर हा यूट्यूबर दुसऱ्या एका कारमध्ये बसून जातो. ज्‍या कारला त्‍याचे मित्र पाठिमागून धक्‍का देतात आणि मग गाडी सुरू होउन तो तिथून निघून जातो. आता याला काय म्‍हणायचे ते तूम्‍हीच ठरवा…

 

Back to top button