जेम्स लेन : बाबासाहेब पुरंदरेंनी खरंच पुस्तक मागे घेण्यासाठी ‘ऑक्सफर्ड’ला पत्र लिहिलं का ? | पुढारी

जेम्स लेन : बाबासाहेब पुरंदरेंनी खरंच पुस्तक मागे घेण्यासाठी ‘ऑक्सफर्ड’ला पत्र लिहिलं का ?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवछत्रपतींची बदनामी करणारे जेम्स लेन लिखित पुस्तक मागे घ्यावे, या मागणीचे पत्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व आपण लिहिले होते. ते पत्र पुण्यातील लोकांची स्वाक्षरी असावी यासाठी पुण्याला पाठविले. बरोबर या गोष्टीचा फायदा घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती हिंदी शिवचरित्रकार डॉ. वसंतराव मोरे यांनी दिली.

इतकेच नव्हे, तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जेम्स लेन यांच्या पुस्तकाबद्दल माफी मागितल्याचे पत्र आपण आपल्या ‘जेम्स लेन संशोधक की विध्वंसक’ या पुस्तकात प्रसिद्ध केल्याची माहितीही डॉ. मोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ. मोरे म्हणाले, जेम्स लेन पुस्तकाचे संपूर्ण प्रकरण खोडसाळपणे करण्यात आले आहे. परदेशी लेखक जेम्स लेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवछत्रपतींच्या बदनामीचे कारस्थान रचण्यात आले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरच्या एका सभेत ‘जेम्स लेनचे पुस्तक सर्वात चांगले पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचावे’, असे विधान केले होते. याची माहितीही आपल्याकडे तारखेसह उपलब्ध आहे; मात्र नंतर मागे-पुढे हे प्रकरण अंगलट येईल म्हणून पुरंदरे व आणखी दोघा- तिघांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पत्रावर स्वाक्षरी केली.

हे ही वाचलं का ?

Back to top button