dinesh karthik : दिनेश कार्तिकच्या फलंदाजीवर फाफ डु प्लेसिस फिदा | पुढारी

dinesh karthik : दिनेश कार्तिकच्या फलंदाजीवर फाफ डु प्लेसिस फिदा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (Kolkata Knight Riders vs Mumbai Indians) यांच्यात सामना रंगणार आहे, मात्र चाहते आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्याचीच जोरदार चर्चा आहे. आम्ही शाहबाद अहमद (shahbaz ahmed) आणि दिनेश कार्तिक (dinesh karthik) या नव्या उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलत आहोत, ज्यांनी मिळून राजस्थानकडून (Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore) त्यांनी जिंकलेला सामना जवळपास हिसकावून घेतला. 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने केवळ 87 धावांत 5 विकेट गमावल्या आणि इथून राजस्थान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी अवघ्या 32 चेंडूत सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत राजस्थानकडून सामना हिरावून घेतला.

या सामन्यानंतर सर्वजण खासकरून दिनेश कार्तिकचे (dinesh karthik) कौतुक करत आहेत. यावेळी कर्णधार फाफ डू प्लेसिसने (faf du plessis) कार्तिकचे कौतुक करताना मोठे वक्तव्य केले आहे. कार्तिकच्या फलंदाजीचे कौतुक करत फाफने सांगितले की, दिनेशने पुन्हा एकदा टीम इंडियात निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित करावे. कार्तिकने 23 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 44 धावा केल्या, तर शाहबाजने 26 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 45 धावा केल्या.

सामन्यानंतर फॅफ म्हणाला की, डीके (dinesh karthik) त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे आणि मला वाटते की त्याने स्वत: पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने फाफ डू प्लेसिस पुढे म्हणाला की, सर्वात वाईट परिस्थितीतून सामने जिंकण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष क्षमता असणे आवश्यक आहे आणि डीके हा असाच एक खेळाडू आहे जो विशिष्ट दिवशी सामने जिंकू शकतो. शेवटपर्यंत शांतपणे फलंदाजी करणे ही जबरदस्त कला आहे. आमच्या संघासाठी ही मोठी गोष्ट आहे कारण शेवटपर्यंत अशा शांत मनःस्थितीमुळे या खेळाडूला सामन्यात चांगली कामगिरी करण्यास मदत होते. भारतीय संघात अनेकवेळा पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकने 2019 विश्वचषकमध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. आता ३७ वर्षांच्या डीकेला फिनिशर म्हणून संघात परतायचे आहे. परंतु त्याचे वय त्याच्या मार्गात अडथळा ठरत आहे.

Back to top button