किसन वीर साखर कारखाना : आ.मकरंद पाटील, नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने खळबळ | पुढारी

किसन वीर साखर कारखाना : आ.मकरंद पाटील, नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने खळबळ

वाई; पुढारी वृत्तसेवा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील. जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने एकाच गोंधळ उडाला आहे. तसेच कोरेगाव, सातारा, वाई बावधन जावळी, गटात अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याने उमेदवांरानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा त्यांच्या आरोप करण्यात आला आहे.

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी विरोधकांनी केली आहे.

आमदारांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील म्हणाले, ऊस नोंदविला असताना कारखान्याने उसाची तोड केली नाही त्यावर्षी 12 लाख टन उसाची नोंद असताना कारखान्यांने चार लाख टनाचे गाळप केले.

कारखाना उशिरा सुरु करुन लवकर बंद केला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला नाही. अनेक शेतकऱ्यांचा ऊस न नेता त्यांचे नुकसान केले. यामुळे उमेदवार अर्जावर  चुकीच्या पद्धतीने नोंद घेवून अर्ज बाद करण्यात आला आहे, तर विरोधकांनी आपली बाजू मांडताना म्हणाले, कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षांमध्ये तीन वर्षे ऊस हा कारखान्याला घालणे आवश्यक आहे, या नियमावर नितीन पाटील यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सोसायटीनी आमदारांच्या विरोधात हरकत नोंदविली आहे. दोघांचेही अर्ज बाद झाल्याने आज अर्ज बाद होण्याच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे.

Back to top button