सांगलीत चिल्ड्रन पार्कचे लोकार्पण | पुढारी

सांगलीत चिल्ड्रन पार्कचे लोकार्पण

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वार्ड नंबर सतरामधील चिल्ड्रन पार्कचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे बालगोपाळांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कल्पद्रुम क्रीडांगणा शेजारी असणारे हे चिल्ड्रन पार्क बाल गोपाळांसाठी सुरू करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आणि महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांच्या पाठपुराव्यातून बालचमुंसाठी एक चांगले चिल्ड्रन पार्क साकारण्यात आले आहे. या चिल्ड्रन पार्कमध्ये बालगोपाळासाठी खेळणी बसवण्यात आले आहेत. याचबरोबर वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या चिल्ड्रन पार्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण उद्यानात समुद्राची रेती वापरण्यात आली आहे. विस्तीर्ण जागेवर 92 लाख रुपये खर्चून हा चिल्ड्रन पार्क उभारण्यात आला आहे. चिल्ड्रन पार्कच्या कामाबाबत समाधान व्यक्त करीत या चिल्ड्रन पार्कमुळे सांगलीच्या वैभवात भर पडेल, असे मंत्री पाटील यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण समिती सभापती ढोपे – पाटील, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.

Back to top button