मुंबई : प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नाेटीस; चौकशीला हजर राहण्याचे आदेश | पुढारी

मुंबई : प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नाेटीस; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई ; पुढारी ऑनलाईन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांना उद्या (सोमवार)रमाबाई आंबेडकर पोलिस स्‍टेशन मध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्‍याचा आरोप त्‍यांच्यावर करण्यात आला. त्‍यानंतर दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला हाेता.

Back to top button