Heat Cities in india: शहरांमधील तापमान वाढीला ‘हा’ घटक कारणीभूत, जाणून घ्‍या संशोधन

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील शहरांच्या तापमान वाढीला केवळ हवामानबदलच कारण नाही, तर वाढत्या शहरीकरणाचा देखील मोठा वाटा (Heat Cities in india) आहे, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. 'Nature Cities' या जर्नलमधूल हा अभ्यास मांडण्यात आल्याचे वृत्त 'Nature India' या वेबसाईटने दिली आहे.

Heat Cities in india: दाेन दशकांमध्‍ये भारतातील १४१ शहरांचा अभ्यास

उर्वरित देशाच्या तुलनेत भारतीय शहरे जवळजवळ दुप्पट वेगाने तापत आहेत. याला सर्वाधिक म्हणजे ६० टक्के शहरीकरण जबाबदार आहे, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला. भुवनेश्वरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अभ्यासात गेल्या दोन दशकांत वेगाने विस्तारणाऱ्या शहरीकरण आणि प्रादेशिक हवामान बदलामुळे १४१ शहरांमध्ये रात्रीचे तापमान किती प्रमाणात वाढले, याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. (Heat Cities in india)

२००३ ते २०२० कालावधीत अभ्यास

संशोधकांनी सन २००३ त २०२० या कालावधीत विस्तारणाऱ्या देशभरातील शहरांचा अभ्यास केला आहे. यामध्ये शहरांतील जमिनीचे रात्रीच्या वेळेचे तापमान मोजण्यात आले. यासाठी MODIS Aqua हा उपग्रह वापरुन तापमानाचा डेटा गोळा करण्यात आला आहे. तसेच रात्रीच्या वेळी जमिनीच्या पृष्ठभागाच्या उष्णतेच्या किरणोत्सर्गाचे मोजमाप (Heat Cities in india) या अभ्यासात करण्यात आले आहे.

शहरीकरण आणि गैर शहरीकरणाचा तुलनात्मक अभ्यास

विस्तारणाऱ्या शहरांमधील तापमानवाढीच्या ट्रेंडची गैर शहरीकरण झालेल्या भागाशी तुलना करण्यात आली. यावरून संशोधकांना असे आढळले की, प्रादेशिक हवामान बदलामुळे प्रादेशिक हवामान बदलामुळे काही शहरात तापमानवाढ होते. याच्या तुलनेत, शहरीकरण झालेल्या शहरात तापमान वाढीचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याचे आढळले.

रात्रीच्या तापमानात  0.53 अंश सेल्सिअसने वाढ

अभ्यास करण्यात आलेल्या अर्बन शहरांमध्ये जवळपास सर्व ठिकाणी रात्रीच्या जमीनीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ दर्शवली. ही वाढ दर दशकात प्रत्येकी सरासरी 0.53 अंश सेल्सिअस इतकी दर्शवण्यात आली आहे. यामध्ये पूर्व आणि मध्य भारतातील शहरांनी देशाच्या तापमान वाढीत मोठी भूमिका बजावल्याचे अभ्यासात स्पष्ट केले आहे.

दर दहा वर्षांत सरासरी 0.26°से इतकी तापमानवाढ

तापमानवाढ ही समस्या केवळ शहरांपुरीतच मर्यादित नाही. तर भारतातील हवामान बदल वेगाने होत असून भारतातील बहुतेक भाग अधिक उष्ण होत आहे. दर दहा वर्षांत सरासरी 0.26°से इतके भारतातील जमीनीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. हे संशोधन शहर नियोजक, धोरणकर्ते यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. संसाधनांचे अधिक चांगल्या प्रकारे वाटप करण्यासाठी आणि शाश्वत शहरे तयार करण्यासाठी आवश्यक नियोजनाचे प्रमाण समजून घेण्यास मदत करू शकते, या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल, असा विश्वास आयआयटी भुवनेश्वरमधील संशोधकांनी व्यक्त केला आहे.

हवामानबदल प्रभावित देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर

ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2018 नुसार, भारत हे हवामानाशी संबंधित अत्यंत तीव्र हवामानाच्या घटनेमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले सातवे राष्ट्र आहे. अभ्यास दर्शवितो की. भारत हवामान बदलाच्या प्रभावासाठी सर्वात असुरक्षित देशांपैकी एक असेल. त्यातील शहरे आघाडीवर आहेत. परिणामी, शहरीकरणाचे प्रमाण आणि व्याप्ती (दोन्ही चालू आणि प्रक्षेपित) आणि हवामानबदल संबंधित जोखमीच्या घटना पाहता, या दोघांचा समन्वयात्मक परिणाम भारतीय शहरांना विशेषतः असुरक्षित बनवेल, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील तापमानवाढ झालेली टॉप २० शहरे

अभ्यासात प्रत्येक दहा वर्षात तापमान वाढ झालेल्या शहरांची तीन टप्प्यात विभागणी केली आहे. यामध्ये पूर्णपणे शहरीकरण झालेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, जयपूर, राजकोट आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. शहरीकरणाचा प्रभाव असलेल्यामध्ये पुणे, रायपूर, जयपूर ही शहरे आहेत. तर शहरीकरणात काही प्रमाणात योगदान असलेल्यांमध्ये जमशेदपूर, रायपूर आणि पाटणा या महत्त्वपूर्ण शहरांचा समावेश आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news